सोलापूर- शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आल्याची माहिती यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर स्थानिक पातळीवर महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या निर्देश नुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आज हुतात्मा स्मृती मंदिर येथे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर आणि परिसरातील सर्व धर्मीय मंदिराचे पुजारी व ट्रस्टींची बैठक हुतात्मा स्मृती मंदिर येथे बोलवण्यात आली होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती सर्व धार्मिक स्थळावर नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टंसिंग वापर करावा तसेच मंदिरात फक्त निरोगी व्यक्तींनाच प्रवेश द्यावे. मंदिर परिसरात कोरोना संदर्भात घोषवाक्य तसेच बॅनर लावण्यात यावे. बाहेरील दुकानांत गर्दी होणार नाही याची देखील काळजी घ्यावे.दर्शन रांगेची व्यवस्था करावी तसेच दर्शन रांगेत प्रवेश करताना व बाहेर जाण्यासाठी मार्ग वेगवेगळे असावे आणि मंदिर परिसर वेळोवेळी सॅनिटजयर करावे व स्वच्छता राखावी अशी सूचना यावेळी देण्यात आले.शहरातील सर्वधर्मीय मंदिर मंदिराच्या ठिकाणी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन केले जाईल व करुणा चा प्रादुर्भाव अधिक होणार नाही याकरिता गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे जबाबदारी मंदिर समिती पुजारी आणि ट्रस्ट यांची असेल आणि तसे निर्देश संबंधितांना दिल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी यावेळी दिली.साहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत हे उपस्थित होते