येस न्युज मराठी नेटवर्क : गुलबर्गा आणि कोल्हापूर येथील विमानसेवा सुरू झाली. विजापूर आणि उस्मानाबाद येथील विमान तळाचे काम सुरू आहे. मात्र सोलापूरकर गेल्या आठ वर्षांपासून केवळ चिमणी भोवती अडकले आहेत. इथे राजकीय नेतृत्व नाही त्यामुळेच सोलापूर शहरातील स्मार्ट सिटी योजनेतील कामांचा बट्ट्याबोळ, कागदावरचा अडकलेले बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ, केवळ मंत्र्यांची विमाने उतरण्याची सोय असलेले मजरेवाडी विमानतळ, सोलापूर शहरात राष्ट्रीय महामार्ग करणार असलेले दोन उड्डाणपूल हे मुद्दे केवल चर्चेचे गुऱ्हाळ आहेत.
त्यातच आता मुंबई पुणे हैदराबाद या स्पीड बुलेट ट्रेनची आणि सुरत ते चेन्नई या ग्रीन कॉरिडोर ची भर पडली आहे. सोलापूरला राजकीय नेतृत्व नाही यामुळेच शहर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यातील सोलापुरात कसे असेल याबाबत थोडतरी चिंतन करायला आणि जागरूकपणे प्रत्येक गोष्टीबाबत दबाव निर्माण करायला तयार राहा असच येस न्यूज मराठी कडून वारंवार सांगणे