सोलापूर : वंचित बहुजन आघाडी च्यावतीने राज्यभर मेळावे सुरूच आहेत त्यातच सोलापुरात दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी संघटन समीक्षा व संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश अध्यक्षा रेखा ताई ठाकूर हे होते मेळाव्याची सुरवात दीप प्रज्वलन करून पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले .यावेळी जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम यांनी महापालिकेत वंचित बहुजन आघाडीच यावेळी बाजी मारेल असे वक्तव्य केले तर शहर अध्यक्ष ॲड.हजरतअली बडेखान यांनी पक्षाला बळकटीकरणााठी आणि आगामी महपालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करेन तसेच महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची धुरा आम्ही सांभाळू असे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण केल्याचे चित्र दिसून आले
कार्यकर्त्यांमध्ये देखील संवाद मेळाव्या दरम्यान मोठा उत्साह व जोश दिसून आला प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित करत आगामी महापालिका निवडणुकीत ताक्तिनिशी काम करून वंचित बहुजन आघाडी ची सत्ता स्थापन करू असा चंग बांधत मेळाव्याचा यशस्विरीत्या समारोप करण्यात आले याप्रसंगी प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर , प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी , माढा विभाग अध्यक्ष राहुल चव्हाण, प्रदेश प्रवक्ते फारुक अहेमद , सोलापूर जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम , शहरअध्यक्ष ॲड. हजरतअली बडेखान , सोलापूर कार्याध्यक्षा अंजनाताई गायकवाड अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते भव्य संख्येने उपस्थित होते