सोलापूर : येथील श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने मोफत वारकरी शिक्षण गेल्या 11वर्षा पासून देणे सुरु आहे. यंदा 12 व्या वर्षात पदार्पण करताना कोरोना महामारीमुळे निवासी वारकरी शिक्षण सुरु करता आले नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील मुलांना कीर्तन – प्रवचन, गायन -वादन मोफत शिक्षण देणे सुरु केले आहे. आरोग्य विभागाचे नियम पळून नियोजन केले होते. महाराष्ट्राची अस्मिता टिकवून घराघरात पोहोचवने गरजेचे आहे म्हणून ह.भ.प. अनंत महाराज इंगळे, ह.भ.प.भागवत महाराज चवरे (पंढरपूर ) यांचे मार्गदर्शन घेऊन तानाजी बेलेराव,किशोर धायगुडे यांचे सहकार्याने हे शिक्षण सुरु केले आहे आणि ऑनलाईन ग्रंथ चिंतन (पाठ) ही सुरु केला आहे.
तसेच या संस्थेच्या वतीने वृक्षारोपण, योग -प्राणायाम शिबीर, व्याख्यानमाला, बालसंस्कार शिबीर दरवर्षी घेतले जाते. महिलांना प्रवचन - भजन शिक्षण दिले जात आहे.महिलांना स्वतंत्र व्यवस्था केली असून विविध सामाजिक उपक्रम केले जात आहेत. तसेच रोज पहाटे ५. ३० ते ७ यावेळेत भगवान बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग -प्राणायाम शिकवले जाते. ह.भ. प. शंकर भोसले यांचे अध्यक्षतेखाली श्री संत मुक्ताई मंदिर राजेश कोठे नगर, लक्ष्मी पेठ सोलापूर येथे कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले.या प्रसंगी शंकर भोसले यांचा सत्कार किशोर धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ह.भ.प.सुधाकर महराज इंगळे उपस्थित होते. यासाठी गोविंद ताटे, नंदा बेलेराव, ऋषिकेश झांबरे, सचिन भोसले, प्रभाकर ताटे, नितीन जाधव,चंद्रकांत जांभळे, इ. पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.अधिक माहितीसाठी ९४२२४६२६८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.