सोलापूर- स्मार्ट सिटी च्या माध्यमातून होम मैदान येथे उभारण्यात आलेल्या स्ट्रीट मार्केटची उभारणी करण्यात आली आहे माहित एक वर्षापासून उपयोगात आले नाही लवकरात लवकर जाहीर प्रसिद्धी करून सदर स्ट्रीट मार्केट येथील गाळे व्यापार्यांना उपलब्ध करून दिल्यास पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे म्हणून बुधवारी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, विरोधीपक्ष नेते अमोल शिंदे,आयुक्त पि.शिवशंकर,सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील यांनी स्ट्रीट मार्केटचे सौंदर्य अबाधित ठेवून व्यापार करणाऱ्या गाळेधारकांना उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.लवकरात लवकर निविदा काढून स्ट्रीट मार्केट येथील गाळे उद्योजकांना उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी यावेळी दिली.मुंबई पुण्याच्या धर्तीवर होम मैदान येथील स्ट्रीट मार्केट चे नियोजन पालिका प्रशासनाकडून केले जाईल असा विश्वास सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.स्ट्रीट मार्केटचे सौंदर्य आजूबाजूचा परिसर याचा विचार करून पालिका प्रशासनाने स्ट्रीट मार्केटला खाऊ गल्ली करू नये अशी अपेक्षा यावेळी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी व्यक्त केली.स्ट्रीट मार्केट मधील गाळेधारकांना कोणत्या पद्धतीच्या व्यवसाय करता गाळे उपलब्ध करून द्यावे यासंबंधीचा निर्णय लवकरच घेतला जाईल शिवाय निविदा प्रक्रिया सुरू करण्यावर प्रशासनाकडून चे प्रयत्न केले जातील असा विश्वास यावेळी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी व्यक्त केले.दरम्यान महापौर पालिका सभागृह नेते विरोधी पक्ष नेते यांनी शिंदे चौक चौपाटी मोबाईल गल्ली आधी भागामध्ये सुरू असलेल्या स्मार्ट सिटी च्या कामाची पाहणी करून पालिका आयुक्तांनी आवश्यकता सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
