सोलापूर:- कर्जत जामखेड मतदारसंघातील खर्ड्याला मराठ्यांनी शेवटची लढाई जिंकली. या दैदिप्यमान पराक्रमाची पताका डौलाने फडकत रहावी यासाठी खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात शक्ती-भक्ती, एकता व समानतेचं प्रतीक असलेला ७४ मीटर इतका देशातील सर्वांत उंच भगवा ‘स्वराज्य ध्वज’ आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणार आहे.
तत्पूर्वी देशातील ७४ भक्ती-शक्तीपीठांच्या ठिकाणी पूजेसाठी यात्रा निघाली. भारतातील सहा राज्ये, महाराष्ट्रातील ३६ जिल्हे ३७ दिवस हा स्वराज्य ध्वज एकूण १२००० किलोमीटरचा प्रवास करणार आहे, याचा शुभारंभ कर्जतच्या संतश्री गोदड महाराज मंदिरातून झाला. कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम होतोय. हा स्वराज्य ध्वज येत्या २२ सप्टेंबर रोजी सोलापूर शहरात येणार आहे. महात्मा बसवेश्वर पुतळा येथे सायंकाळी ७ वाजता येणारं आहे त्यावेळेस ध्वज पूजन होणार आहे. अणि २३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता मार्कंडेय मंदिर येथे ध्वज पूजन होईल आणि सकाळी ९ वाजता सिध्देश्वर मंदिर येथे ध्वज पूजन होईल आणि सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ होईल तरी सोलापूर करानी या शुभ कार्यक्रमाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा, ही विनंती असे आवाहन प्रशांत बाबर यांनी केले आहे.