आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनची मागणी..
सोलापूर : आंध्रप्रदेश येथील चित्तूर जिल्ह्य़ातील जगप्रसिद्ध असलेल्या तिरुमला- तिरुपती (बालाजी ) देवस्थानम संस्थेवर सोलापूरातील पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांची सदस्य म्हणून निवड करावीत, अशी मागणी सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्याकडे ईमेल पाठवून मागणी केली आहे.

सोलापूरातील पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे असून सोलापूर महापालिकेचे महापौर म्हणूनही लाभलेले आहेत. तसेच जुना विडी घरकुल येथे अनेक विकासकामे केलेले आहेत. सोलापूरचे राजकारण त्यांच्याभोवती फिरत असतो. अशा या समाजाचे अध्यक्षांना तिरुमला – तिरुपती देवस्थानम संस्थेवर सदस्य म्हणून निवड करावीत. अशी मागणी करण्यात आली आहे. तिरुमला – तिरुपती (बालाजी) देवस्थानम संस्थेवर यापूर्वी पद्मशाली समाजाला सदस्य म्हणून संधी मिळाली होती. पुराणातील कथेनुसार भगवान तिरुपती (बालाजी) हे पद्मशाली समाजाचे जावई होत. याच अनुषंगाने अखंड आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री राहिलेले एन. चंद्राबाबू नायडू यांनी यापूर्वी समाजाला संधी दिली होती. तिरुमला-तिरुपती (बालाजी) देवस्थानम आंध्रप्रदेशच्या सरकारच्या अधीन आहे. वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे मुख्यमंत्री झाल्यापासून अद्यापही समाजाला संधी दिली नाही.
सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी सदरचे ईमेल आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना पाठवून मागणी केली आहे.