सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावात सोमवारी २० सप्टेंबर रोजी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. यावेळीं या लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळाला या मोहीमेत एकूण 220 लोकांनी याचा लाभ घेतला .यामध्ये गावतील महिला -पुरुष तसेच जेष्ठ नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.पडसाळी गावात ही दुसरी मोहीम राबविण्यात आली होती या दोन मोहिमेत एकूण 400 ते 410 लोकांनी याचा लाभ घेतला.हे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र कळमन अंतर्गत उपकेंद्र रानमसले यांच्या अंतर्गत घेण्यात आले.
यावेळी येथे उपस्थित डॉ.संतोष बारसोळे ,सीएचओ अमृता साठे,आरोग्य सहायक शंकर सिरसट,आरोग्य सेविका सुनीता बोंदर,आरोग्य सहायक महिंद्र माने,आरोग्य सेवक मोहन लामकाने, सय्यद सिस्टर,बीएफ सोनाली साठे तसेच गावतील आशा वर्कर लक्ष्मी सिरसट,उर्मिला आदलिंगे तसेच ग्रामपंचायत शिपाई गुरबा भोसले ,संतोष मोरे यांनी हे लसीकरण यशस्वी करण्यासाठी अथक पर्यंत केले.