सोलापूर – स्मार्टसीटीच्या माध्यमातून सुरू असलेले पार्क स्टेडियमच्या कामाची पाहणी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे ,आयुक्त पी.शिवशंकर,यांनी केली. स्मार्ट सिटी अंतर्गत पार्क स्टेडियमचे काम करण्यात आले असून ते काम पूर्ण झाले आहे.त्या अनुषंगाने प्रशासनाकडून सर्वसाधारण सभेकडे हे विषय पाठवण्यात येणार आहे. त्याकरिता आज पार्क स्टेडियमची पाहणी करून ते महापालिकेकडे हस्तांतरण करून घेण्यात येणार आहे. हस्तांतरण झाल्यानंतर खेळाडूंसाठी हे मैदान खुले करण्यात येणार आहे. अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.
स्मार्ट सिटीला पार्क स्टेडियम हे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काम करण्यासाठी देण्यात आली असून यावरती पूर्ण अधिकार हे महापालिकेचे महापौर व आयुक्त यांचा आहे असेही महापौर म्हणाल्या स्मार्ट सिटी चे सीईओ हे चुकीचे काम करत असल्याचा आरोप महापौर यांनी केले.स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पार्क स्टेडियम येथील पहिल्या टप्प्यामध्ये कामे पूर्ण झाली असून त्याची पाहणी आज महापौर विरोधी पक्षनेते व सभागृह नेते यांच्या समवेत करण्यात आले आहे. येत्या 20 तारखेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पार्क स्टेडियम महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. तसेच पार्क स्टेडियमची टेंडर मध्ये देण्यात आलेल्या कामाची तपासणी करूनच महापालिकेकडे हस्तांतरण करून घेण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली. पार्क स्टेडियम ही सोलापूरच्या खेळांची पंढरी म्हणून ओळखली जाते या पार्श्वभूमीवर पार्क स्टेडियम येथे क्रिकेटपासून ,हॉलीबॉल, कबड्डी ,खो-खो स्पर्धा घेण्यात येत असे आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये फक्त क्रिकेट साठी मैदान तयार करण्यात आले आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये हॉलीबॉल, कबड्डी ,खो-खो साठी मैदान तयार होणार आहे. पार्क स्टेडियमच्या मागील बाजू मध्ये अजून काही जागा शिल्लक आहे. त्या ठिकाणी विविध खेळांच्या असोसिएशन यांना जागा तसेच खेळाडूंसाठी हॉस्टेल या ठिकाणी तयार करण्यात यावे.आणि ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे यांनी व्यक्त केली.आज पार्क स्टेडियमची पाहणी करण्यात आली असून येत्या दोन दिवसात सर्वसाधारण सभेपुढे स्मार्ट सिटीचे पार्क स्टेडियम हे हस्तांतरण करून घेण्यासंदर्भात सभेपुढे येणार आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या सीईओ यांनी मॅचेस घेण्यासंदर्भात परवानगी दिली आहे. असे वृत्तपत्रांमध्ये माहिती मिळाली त्यांना तो अधिकार नसून पार्क स्टेडियमचे अध्यक्ष महापौर असून आयुक्त यांनाही अधिकार आहेत हे अधिकार हिरावून घेण्याचा स्मार्ट सिटीच्या अधिकारी यांनी केले आहे. ते नियम बाह्य असून तसे त्यांना करता येणार नाही.तसेच पार्क स्टेडियम येथे लवकरच सोलापूर आयपीएल मॅच भरण्यात यावी अशीही ही विनंती महापौर व आयुक्तांकडे सभागृह येथे शिवानंद पाटील यांनी केली. यावेळी सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील,क्रीडा अधिकारी नजीर शेख तसेच महापालिकेचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.