मुंबई : परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांची नोंद ठेवणं गरजेचं असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे मुद्दे वेळोवेळी उपस्थित केले होते. तसेच हेच मुद्दे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही पटलेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काल गृहविभागाशी महत्त्वाची चर्चा केली. या बैठकीत त्यांनी परप्रांतिय आणि रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाविषयी काही महत्त्वाच्या सूचना केल्या.
राज्यात दररोज अनेक परप्रांतिय दाखल होतात. ते परप्रांतीय कुठून येतात? कुठे जातात? कुठे राहतात? याची कसलीही नोंद नाही. ती नोंद राहिली पाहिजे, परप्रांतीयांच्या बाबतीची माहिती ही स्थानिक पोलीस स्टेशनकडे आणि राज्य सरकारकडे असलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरेंनी वारंवार मांडली होती.