रजत फायनान्स चे आनंद दशरथ अलकुंटे यांनी दिलेला 3 लाख 90 हजार रुपयांचा चेक न वटल्यामुळे मीरा दामाजी भिसे या महिलेने सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रजत फायनान्सचे आनंद अलकुंटे यांच्याविरुद्ध यापूर्वीदेखील फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. प्रशांत फायनान्स मध्ये गुंतवणूक केलेल्या अनेकांचे पैसे अडकले असल्यामुळे पोलिसांकडे बऱ्याच तक्रारी प्रलंबित आहेत.
**
कोर्टात केस केल्यामुळे मारहाण…
कोर्टात केस केल्यामुळे श्रीनिवास गड्डम यांनी अक्कलकोट रोड गांधी नगर येथे राहणाऱ्या संगमेश्वर यांना कांबळे याला जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस विभागाचे माधव रेड्डी अधिक तपास करीत आहेत.