सोलापूर : काल दिनांक 11 सप्टेंबर रोजी वांगी तालुका दक्षिण सोलापूर येथे covid-19 लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरांमध्ये तब्बल 430 ग्रामस्थांनी कोरोनाची कोवीशील्ड ही लस घेतली. सदर मोहीम ही मेगा लसीकरण या मोहिमेअंतर्गत राबवण्यात आलेली होती. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात डॉक्टर घोगरे मॅडम यांचे सहकार्य लाभले व तसेच आरोग्य सेवक संजय मारुती कोळी, आरोग्य सेविका संगीता नवाळे, परीक्षक श्रीपत अंबेखिचडी यांनी लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली.
सदर लसीकरणाचे आयोजन ग्रामपंचायत वांगी यांच्यामार्फत करण्यात आलेले होते या लसीकरणात वांगी चे सरपंच श्यामराव हांडे, उपसरपंच शब्बीर तांडूरे,तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार तोडकरी , ग्रामपंचायत कर्मचारी चांद मकानदार , शब्बीर रसूल शेख आणि आपुलकी युथ फाऊंडेशनचे धर्मराज कोळी कबीर तांडूरे, अहमद शेख इत्यादिने लाभार्थीचे व्यवस्थापन करून सहकार्य केले. तसेच सदर लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी वांगी येथील युवकांचे मोलाचे योगदान राहिले रजनीकांत जवळकोटे, संतोष जवळकोटे ,प्रसाद बनसोडे, नागराज बिराजदार, दिनेश बालगांवकर, अक्षय जवळकोटे, श्रेयस पाटील, धर्मराज जवळकोटे इत्यादि युवकांनी नोंद आणि टोकन वितरणाचे कार्य पूर्ण केले. अंतिमता, ग्रामपंचायत वांगी यांच्यामार्फत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे ,आरोग्य सेवकांचे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.