बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कलेचा अधिपती असलेल्या गणरायाचे आज घरोघरी आगमन होत आहेत.
यामुळे ठिकठिकाणी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोष ऐकायला मिळत आहे.
मुंबई, नवी मुंबई, पुण्यासह कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
पुण्यात प्लास्टिकच्या बाटल्यापासून गणपती बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाजूच्या मंडपात ही मूर्ती साकारण्यात आली आहे.
प्लास्टिकच्या बाटल्यांपासून साकारलेली गणरायाच्या मूर्ती पाहण्यास भाविकांनी गर्दी केली आहे.