सोलापूर:- सोलापूर शहरातील प्रमुख रस्ता छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यावरील गेल्या 4 दिवसांपासून गटनेते आनंद चंदनशिवे यांनी खड्डे बुजविण्याच्या संदर्भात पाहणी करून खड्डे बुजविण्याच्या सुचना महानगरपालिकेचे अधिकारी व नॅशनल हायवेचे अधिकारी यांना दिली होती.
खड्डे न बुजविल्यास आंदोलन करण्याचा इशारा गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिला. आंदोलनाचा इशारा देताच आज दु.3.00 वाजल्यापासून छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. गटनेते आनंद चंदनशिवे यांनी स्वत: उपस्थित राहून खड्डे बुजविण्याच्या सुचना यावेळी दिल्या. तसेच शहरातले इतर विभागातले खड्डे बुजविण्याचे काम त्वरीत हाती घ्यावे अशी विनंती गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केली.
या प्रसंगी विभागीय कार्यालय क्र.1 चे विभागीय अधिकारी तपन डंके व नॅशनल हायवेचे अधिकारी उपस्थित होते.