सोलापूर : राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम (NCAP) अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आणि सायकलिस्ट फाऊंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ सप्टेंबर २०२१ रोजी International Day Of Clean Air For The Blue Skies च्या अनुषंगाने नागरिकांमध्ये हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती होणे करिता उपायुक्त धनराज पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, मुख्य आरोग्य निरीक्षक सुधाकर नागटीळक यांच्या उपस्थितीत सात रस्ता येथून ही जनजागृतीपर सायकल राईड आयोजित केली होती.
सदर राईडमध्ये शहरातील विविध भागांतील सायकल प्रेमींनी सहभाग नोंदविला असुन सहभागी सायकल स्वारांना सोलापूर महानगरपालिकेकडून सहभाग ई-प्रमाणपत्र, एक रोपटे व एक कापडी पिशवी भेट म्हणून देण्यात आली.सदर सायकल रॅली ही सात रस्ता – मसिहा चौक – पत्रकार भवन – महावीर चौक – आसरा चौक (माघारी) – महावीर चौक – गुरुनानक चौक – सात रस्ता – रंगभवन प्लाझा येथे समारोप.करणेत आला असुन सर्व सायकल स्वारांना मा उपायुक्त साहेब व शहा सर यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर सायकलिस्ट फौंडेशनचे अध्यक्ष सारंग तारे, सोलापूर महापालिकेच्या पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर, विजयकुमार लोखंडे, अजयकुमार चव्हाण व राहुल फाटके यांनी विशेष प्रयत्न केले.