अमेरिकेतील कोलाराडो येथील एका नर्सने covid-19 सी च्या रिकामा वाटलं पासून एक एक अद्भुत झुंबर बनविले आहे. बॉर्डर काउंटी सार्वजनिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या लॉरा वेसेस या नर्सने लसीकरणासाठी मदत करणाऱ्या आरोग्य सेवक आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना सलाम करण्यासाठी हे झुंबर बनविले आहे .
या झुंबराला या नर्सने ‘लाईट ऑफ ऍप्रिसिएशन’ असे नाव देऊन सर्वांची मने जिंकली आहेत. बॉर्डर काउंटी पब्लिक हेल्थ या नावाने या झुंबराची छायाचित्रे फेसबुक पेज वर शेअर करण्यात आली आहेत. लॉरा वेसिसला सांगितले की , मी लसीकरणाचे काम करीत होते, तेव्हा माझे लक्ष रिकाम्या बाटल्या कडे नेहमीच जात होते. इतक्या साऱ्या बाटल्या एकाच ठिकाणी पहायला मिळाल्या तर खूपच शानदार वाटेल, असा विचार मनात आला. वेसिस हीने या रिकाम्या बाटल्यांचा उपयोग करण्याची परवानगी मागितली आणि जगासमोर झुंबर सादर करून आपली कला सादर केली. कोरोना काळात अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागले . अनेक लोकांनी खुप काही गमावले, त्यामुळे झुंबर बनवून ह्या लोकांच्या समोर आशादायी चित्र निर्माण करण्यासाठी हे झुंबर बनवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लॉरा बेसिस हीने सर्वप्रथम एक ऑनलाईन फ्रेम खरेदी केली आणि त्यानंतर लसीकरणाच्या रिकाम्या बाटल्या या फ्रेमला चांगल्या लावल्यानंतर प्रकाश सर्वत्र पसरला . लारा वेसेस आता निवृत्त झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात तिने आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी मदत केली होती.