सोलापूर : महाराष्ट्रातील वीज क्षेत्रामधील सदैव अग्रेसर असणारी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेचा ४४ वा वर्धापनदिन शनिवार, दि. ०४ सप्टेंबर २०२१ रोजी सोलापूर येथे साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे रक्तदान शिबीर संपन्न करण्यात आले.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे बारामती परिमंडळ अध्यक्ष ओंकारनाथ गाये, माजी केंद्रीय उपाध्यक्ष B. B. श्रीगणी, सोलापूर मंडळ संघटक श्री शुकुर शेख, सोलापूर शहर विभाग अध्यक्ष सुनील काळे, रवींद्र तुळजापूरकर, विजयकुमार भावी, बालाजी वराडे, मयुर गवते, अनिलकुमार बनसोडे, संजीवकुमार स्वामी, संजीव बसरगी, अशोक निंबर्गी, श्रीराम सलवदे, दत्तात्रय शिंदे, सागर फाळके, विनायक देशमुख व इतर संघटना पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले.