सोलापूर : इंडियन न्यू मार्शल आर्ट तायकांडो कराटे असोसिएशन तर्फे दि. ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी कर्नाटक बदामी येथे ट्रेनिंग कॅम्प व बेल्ट प्ररीक्षा आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ब्लॅक बेल्टसाठी स्नेहल गायकवाड, प्रतिमा टोणपे, कविता जाधव यांना ब्लॅक बेल्ट देण्यात आले. यावेळी अमृता कुंभार, मंजुनाथ सुतार, वैभवी दळवी, यश मुंगसे, नागेश कांबळे, वैष्णवी कांबळे, प्रचित चव्हाण, दीक्षा महसोडा, मोनिका गायकवाड चंदाराणी गायकवाड हे विद्यार्थी उपस्थित होते.
त्यावेळी प्रशिक्षक म्हणून मास्टर सम्राट गायकवाड, अभिजीत गायकवाड, ओंकार कटारे, विश्वजीत गायकवाड व लेडीज कोच सत्यभामा गायकवाड यांनी सहकार्य केले. या परीक्षेत सीनियर पंच किशोर चंदनशिवे सर,भास्कर देडे सर यांनी काम पाहिले. वरील सर्व विद्यार्थी, प्रशिक्षक व पंच यांना संघटनेचे सचिव ग्रँड मास्टर युवराज एम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले…