सोलापूर,दि.1: इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड, वरळी मुंबई यांनी पेट्रोल पंपाच्या ऑपरेटर नेमणुकीसाठी 60 वर्षाखालील जे.सी. ओ. किंवा समकक्ष रँक असलेल्या माजी सैनिकानी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
पात्र माजी सैनिकांनी आपले अर्ज 3 सप्टेंबर 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्याकडे पाठवावेत. अधिक माहितीसाठी www.iocl.com या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाशी दूरध्वनीवरुन 0217-2731035 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.