मुंबई : अभिनेत्री सायर बानो यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना तीन दिवसांपूर्वी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्त दाबाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची प्रकृती अद्याप ठिक नसल्यामुळे सायरा बानो यांना ICU मध्ये हलवण्यात आले आहे.
सायरा बानो यांची ऑक्सिजनची पातळी देखील कमी होत आहे. ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. गेल्या 54 वर्षांपासून दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत आयुष्य जगत असलेल्या सायरा बानो यांची प्रकृती अचनाक खालावली आहे. चिंता करण्याची काही गरज नाही. पण काही दिवस त्यांना रूग्णालयात राहावे लागणार आहे.
सायरा बानो यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 साली मसुरीत झाला. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट सिनेमांत काम केल आहे . सायरा बानो यांनी 1966 साली आपल्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले . दरम्यान दिलीप कुमार यांचे निधन 7 जुलै रोजी झाले . तेव्हा सायरा बानो यांनी मोठा धक्का बसला.