मुंबई : काँग्रेसचे सोलापूर शहर अध्यक्ष जुबेर बागवान यांनी शहरातील पाणी प्रश्नाची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांना दिली . मुंबई पक्ष कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी महानगरपालिकेच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती .
त्या बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी शहराच्या पाणी प्रश्नाची माहिती दिली. टाकळी ते सोलापूर पाईपलाईन 65 वर्षे जुनी असून ती कधीही बंद पडते. ती जर बंद पडली तर सोलापूरकरांना जल संकटाला सामोरे जावे लागेल असे जुबेर बागवान यांनी स्पष्ट केले .