सोलापूर, दि. ३१- जुळे सोलापुरातील रेणुकानगरीमधील एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. ही उघडकीस आली. मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. श्रीकांत बाळासाहेब यलगोंडे (वय २९, रा. रेणुकानगरी) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो एका खासगी कंपनीत अन्नपदार्थ पुरविण्याचे काम करीत होता. सोमवारी पहाटे साडेतीनच्या तो दारू पिऊन घरी आला. त्याच्या पत्नीने त्यास अंघोळ घालून घरात झोपविले. त्यानंतर दुपारी त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यास झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो उठला नाही. त्यामुळे पत्नीने दीराला फोन करुन बोलाविले. परंतु कोणीही बघायला घरी आले नाही. त्यानंतर मंगळवारी घरातील बेडरुममधून वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी विजापूर नाका पोलिसांना फोन करुन बोलाविले. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजेल
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन पंचनामा करुन श्रीकांत याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला आहे. उद्या (बुधवारी) शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी सांगितले