येस न्युज मराठी नेटवर्क : ओ बी सी भटके विमूक्त जाती मुक्ती दिनानिमित्त आयोजित निर्धार मेळाव्यासाठी आज महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार माननीय विजयजी वड्डेवट्टीवार साहेबांचे सिद्धरामेश्वरांच्या सोलापूर नगरीत आगमन झाले असता वडार समाज सोलापूर कडून श्री सी ए सुशील बंदपट्टे यांनी जंगी स्वागत केले. त्या नंतर वड्डेवटीवार साहेबांनी छत्रपती शिवरायांचे हार घालून आशीर्वाद घेतले.
आजच्या दिवसाचे महत्व जाणत मंत्री साहेबांनी सोलापूरच्या हुतात्म्यांना देखील मानवंदना दिली. शिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना देखील प्रणाम करून आशीर्वाद घेतले.
ज्या महामानवाने भारत देशाला भारतीय राज्य घटना दिली आणि खऱ्या अर्थाने ओबीसी विमुक्त जातींच रक्षण केले अश्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत मानवंदना दिली
सदर स्वागत सत्काराचे नियोजन वडार समाज आणि सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष. सी ए सुशील बंदपट्टे यांनी केले होते. या प्रसंगी विधानपरिषद आमदार राजेशभैय्या राठोड ,ओबीसी विमुक्त जाती राज्य सन्मवय समितीचे सुशीलाताई मोराळे , अरुण खरमाटे , साधनाताई राठोड , नवनाथ पडळकर ,संजयबापू विभुते ,नामदेवराव आहिलवार ,अर्चनाताई पांचाळ ,हरिभाऊ गायकवाड , आणि शरदराव कोळी वडार समाजाकडून दीपक जाधव ,शंकर चौगुले , खान संघटना अध्यक्ष लक्ष्मण विटकर, दिगंबर कुलकर्णी , अशोक विटकर, प्रभाकर मुद्दे ,संजय यमपुरे , बालाजी यमपुरे , नंदू भांडेकर , विकास विटकर , श्रीनिवास यमपुरे , सुरज कन्नुरे , विनायक अलकुंटे , आदी बांधव आणि चंद्रनील सदस्य व मित्र परिवार , महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते