संजय राऊतांचा भाजपला खडा सवाल
मुंबई : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. मात्र भाजपवाले मंदिरं उघडण्यासाठीआंदोलन करत आहेत. पण काळजी घेण्याचे आवाहन, नियमावली केंद्राने पाठवली आहे. जर भाजप नेत्यांवर कारवाई केली तर हे आम्हाला हिंदुत्वविरोधी ठरवतील. आता अमित शाहांच्या गृहखात्याने नियमावली जारी केली आहे, त्यांनाही तुम्ही हिंदुत्वविरोधी ठरवणार का असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
नोटीस येत आहेत, त्याबाबत राजकीय दबाव आहे. एका पक्षाचे, भाजपचे नेते सोशल मीडियावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची यादी जाहीर करत आहेत, यांना ईडी बोलवणार. हे ईडीचं समन्स आहे की भाजपचं हा संभ्रम आहे. भाजपचे प्रमुख लोक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या १० लोकांची यादी जाहीर केली, भाजपचे लोक ईडी कार्यालयात बसले की ईडीचे लोक भाजप कार्यालयात हे शोधण्याची गरज.
अनिल परब यांना ईडी नोटीस आली, मात्र ते आज जाणार नाहीत. ईडी काय करतेय, सीबीआय काय करतेय? कुणाला वॉरंट जातय, कुणाची संपत्ती जप्त होते आहे , याची यादी भाजपवाले सोशल मीडियावर टाकत आहेत. ईडी भाजप चालवतेय का भाजपला ईडी चालवतेय?
केरळमध्ये तिसरी लाट येत आहे. महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने उघडलं जात आहे. मात्र काही राजकीय पक्ष आहेत ज्यांना बेस नाही, ते नियम पाळत नाहीत. ही बंधने केंद्राने घातली आहेत. दहीहंडी आणि गणेशोत्सवावर काळजी घेणं आवश्यक आहे असे केंद्राने सांगितल. महाराष्ट्र तिसऱ्या लाटेवर आहे.
भाजपवाले मंदिरासाठी आंदोलन करत आहे, यावर केंद्र सरकार अक्शन घेणार का? आम्ही घेतली तर हिंदुत्वविरोधी म्हणाल. केंद्राने नियमावली दिली, गृहमंत्री अमित शाहांच्या खात्याने दाखवली आहे, अमित शाह हिंदुत्वविरोधी आहेत का? केंद्र सरकारचे नियम पाळत नाही, मग केंद्र सरकारही हिंदुत्वविरोधी आहे का? असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले.