नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादकांना डिझेल इंजिन वाहनांचे (diesel engine) उत्पादन आणि विक्री बंद करण्यास आणि इतर तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. ऑटो उद्योगाची संघटना असलेल्या सियामच्या वार्षिक परिषदेत (Siam Annual Conference) . संबोधित करताना गडकरी म्हणाले की, सरकार फ्लेक्सिबल सिस्टमवाल्या इंजिनांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे, जे ग्राहकांना 100% पेट्रोल किंवा 100% बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय देईल.
नितीन गडकरी म्हणाले की, “मी वाहन उत्पादकांना डिझेल इंजिन वाहनांचे उत्पादन आणि विक्री डिसकरेज करण्याचे आवाहन करतो. डिझेलमुळे होणारे प्रदूषण पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. ते म्हणाले, उद्योगाने पर्यायी इंधन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि पर्यायी इंधनासाठी संशोधन आणि विकास (आर अँड डी) वर खर्च केला पाहिजे.