सोलापूर : सोलापूर शहरातील विविध अडचणी व समस्यांबाबत सोलापूर महापालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता भरणे यांची भेट घेतली. यावेळी सोलापूर शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने
१) सोलापूर शहरातील समांतर जलवाहिनीचा प्रश्न निधीअभावी व भूसंपादन अभावी रखडलेला आहे तो त्वरित मार्गी लावण्यात यावा.
२) सोलापूर शहरातील रमाई आवास योजना अंतर्गत जुन्या लाभार्थ्यांना उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा
३) सोलापूर शहरासाठी विशेष निधी देण्यासंदर्भात मागणी केली
४) रमाई घरकुल आवास योजनेबाबत सहा.आयुक्त समाज कल्याण विभाग सोलापूर तसेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून नवीन लाभार्थी यादी व पात्र यादी लवकरात लवकर मागवून या यादीस अंतिम मंजुरी देण्यात यावी.
समांतर जलवाहिनी संदर्भात स्वतंत्र बैठक लावण्या संदर्भात व रमाई आवास योजने बाबत समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यासंदर्भात संबंधितांना आदेश देण्यात आले. यावेळी गटनेते नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, एसके फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर, चंद्रकांत सोनवणे विष्णू जगताप व कार्यकर्ते उपस्थित होते.