सोलापूर- प्रतिनिधी : मोहोळ विधानसभा मतदार संघाअंतर्गतील विविध समस्या व विकास कामे मार्गी लागावीत यासाठी शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून विविध विकास कामांची निवेदने देऊन कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची मागणी केली आहे.
२५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन मोहोळ विधानसभा मतदारसंघामधील सर्व विकास कामाबाबत शिवसेना नेते सोमेश क्षीरसागर यांनी निवेदने दिली व सकारात्मक चर्चा करून सर्व कामाबद्दल आश्वस्त केले.विविध कामांची निवेदने देऊन त्याचा येथून पुढे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक हे राष्ट्रीय महामार्गाचे मध्यवर्ती ठिकाण असून सुद्धा व सर्व परिसर उजनी कॅनलमुळे परिसर बागायती असून देखील कोणत्याही प्रकारचा पशुवैद्यकीय दवाखाना नाही. शेतकऱ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. पिरटाकळी येथील शेतकऱ्यांना विजेच्या समस्येमुळे दिवस-रात्र विजेसाठी त्रास सहन करावा लागतो याठिकाणी ३३/११ केव्हीचे सबस्टेशन मंजूर झाले तर शेतकऱ्यांचा त्रास कमी होणार आहे. याचसोबत मोहोळ तालुक्यातील कामती भागातून भरत शेतकऱ्यांना जमिनीचे दस्त करून घेण्यासाठी मोहोळ ला यावे लागते त्याचसोबत सर्वर डाऊन असल्यामुळे एका कामासाठी सात ते आठ हेलपाटे वेळ वाया जात असल्यामुळे आमची परिसरामध्ये दुय्यम निबंधक कार्यालयाची शाखा सुरू करणे गरजेचे आहे. कामती गाव ते राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे येथील परिसरामध्ये कोणताही मोठा दवाखाना नसल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर होणे गरजेचे आहे त्याचं वय शासकीय यंत्रणेची रुग्णवाहिका जर या दवाखान्याला दिली अनेक जणांचे जीव वाचणार आहेत.
शैक्षणिक क्षेत्राचा गुणवत्ता वाढली पण क्रीडा संकुलाअभावी क्रीडाक्षेत्राचा म्हणावा तसा दबदबा निर्माण झाला नाही. मोहोळ शहरामध्ये पाच कोटी रुपये पडून असलेल्या क्रीडासंकुलाची लवकरात लवकर निर्मिती करणे मोहोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी गरजेचे आहे.मोहोळ शहर सोलापूरच्या नजीक असल्यामुळे व पंढरपूरला देखील उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे सातत्याने आरोग्याच्या बाबतीत मोहोळची कुचंबणाच झालेली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर सोडले तर सोलापूरपर्यंत एकही उपजिल्हा रुग्णालय नाही त्यामुळे मध्यभागी अपघात झाला तर सोलापूरला पाठवेपर्यंत रुग्ण दगावू शकतो त्यामुळे मोहोळला उपजिल्हा रुग्णालय झाले तर खूप जणांचे जीव वाचणार आहेत. याच सोबत म्हणून नगर परिषदेच्या पायाभूत व मूलभूत विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे तीदेखील पूर्ण करण्यात यावी त्याचं वाच मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी रस्त्यांचा खूप गंभीर प्रश्न आहे याचसोबत मोहोळ तालुक्यातील नांदगाव, पोफळी, मुंढेवाडी, अर्जुनसोंड, विरवडे बुद्रुक या गावांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे त्यामुळे नांदगाव येथे सीना नदीवर सीएनबी पद्धतीचा सिमेंट बंधारा मंजूर केला तर या सर्व गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असल्याने मोठ्या प्रमाणात निधीची मागणी केली असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
विकास कामासंदर्भात सकारात्मक चर्चा
मोहोळच्या सर्वांगीण विकासासंबंधी विविध मागण्यांसाठी काल सायंकाळी राज्याचे मा.मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. आम्ही निवेदनामार्फत केलेल्या मागण्यांचा विचार करून त्यांनी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावेत यासाठी त्यांना विनंती केली.लवकरच सर्व मागण्या मान्य होतील.
- सोमेश क्षीरसागर, युवा नेते शिवसेना मोहोळ
विकासकामाबाबत केल्या या मागण्या :
कामती येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 मंजूर करणेबाबत
पीरटाकळी येथील ते ३३/११ केवी सब स्टेशनला मंजुरी
कामती बुद्रुक येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची शाखा सुरू करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना शिफारस,
मौजे कामती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करून त्यास कायमस्वरूपी रुग्णवाहिका मिळावी
मोहोळ येथे क्रीडा संकुल मंजूर करून त्याचे काम सुरू करणे,
मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करणे बाबत
मोहोळ नगरपरिषद पायाभूत व मूलभूत विकास कामासाठी निधी मिळण्याबाबत
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील ३०/५४ व ५०/५४ डीपीसी मधून निधी मंजूर करणेबाबत
मोहोळ तालुक्यातील नांदगाव येथील सीना नदीवर सीएनबी सिमेंट बंधारा मंजूर होणेबाबत