• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : सीईओ स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 26, 2021
in इतर घडामोडी
0
ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : सीईओ स्वामी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी वेबेक्स मीटिंगद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा बाबत सविस्तर माहिती दिली. ग्राम सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करते. ही यंत्रणा वापरून नागरिक आपत्कालीन परिस्थितीत कशा पद्धतीने मदत मिळवू शकतात. आजपर्यंत नाशिक, सातारा, पुणे व अहमदनगर या जिल्ह्यात ही यंत्रणा यशस्वी रित्या कार्यान्वित झाली असून कित्येक संभाव्य दरोडे यामुळे टळले असून अनेक दरोडेखोरांना दरोड्याआधीच पकडणे या यंत्रणेमुळे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे गतवर्षी नाशिक जिल्ह्यात पुर परिस्थितीत अनेक नागरीकांना वेळेत मदत करणे प्रशासनास शक्य झाले आहे. अशी माहिती सातपुते यांनी यावेळी दिली.

त्याचप्रमाणे सीईओ दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेऊन या व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले. या वेबेक्स मिटींगमध्ये प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड, सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. यावेळी हा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थी रूपये 50 प्रमाणे प्रतिवर्ष शुल्क आकारण्यात येणार आहे सदरचे शुल्क ग्रामनिधी/वित्त आयोग/लोकसहभाग या माध्यमातून हे शुल्क भरून तीन महिन्यांच्या आत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करा.

  • पहिल्या टप्प्यात छोटी व निधीची अडचण नसणारी गावे तातडीने पुर्ण करा.
  • दुसऱ्या टप्प्यात मोठी व निधीची अडचण असणारी गावे निधीची तरतूद करुन पुर्ण करा.
  • गटविकास अधिकाऱ्यांसह गटशिक्षणाधिकारी यांनी तातडीने सुयोग्य नियोजन करून यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत गावोगावी भेटी द्या. जनजागृती करा अशा सूचना यावेळी सीईओ स्वामी यांनी दिल्या.

या यंत्रणेचा लाभ घेण्यासाठी 18002703600 हा क्रमांक ग्रामस्थांनी आपल्या मोबाईल मध्ये संग्रहित (सेव्ह) करायचा आहे. हा क्रमांक मोबाईल मध्ये सेव्ह करताना मराठी मध्ये “अअअ” अथवा इंग्रजी मध्ये “AAA” या नावाने सेव्ह करावा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल डिरेक्टरीत सर्वात वर हा नंबर असल्याने शोधायला वेळ लागणार नाही.

१. सर्वसाधारण माहिती
ग्राम सुरक्षा यंत्रणा नेमकी काय आहे ? माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात मानवाने परस्परांशी संपर्कासाठी नानाविध साधने बनविली व त्याचा वापर करून मानव प्रगतीही करत आहे. संपर्काची कधी नव्हे एवढी प्रचंड साधने आज जगात उपलब्ध असुन सुध्दा प्रत्यक्ष सं काळात म्हणजे आग, चोरी, दरोडा, लहान मुल हरविणे, महिलांची छेडछाड, वाहन चोरी, शेतातील पिकाची चोरी, गंभीर अपघात, वन्य प्राणी, बिबट्या, तरस, लांडगा यांचा हल्ला आदी घटनांमध्ये तातडीने जवळपास असणाऱ्या नागरिकांशी तत्काळ संपर्क साधुन मदत मागणे आजच्या या उपलब्ध संपर्क साधनांद्वारे शक्य होत नाही. ग्राम सुरक्षा यंत्रणा ग्रामिण भागासाठी सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षापासुन शेकडो गावांत सदर यंत्रणा कार्यान्वित आहे. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर आपल्या गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणेत नोंदवन यंत्रणा वापरत आहेत. संपुर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने संकट काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकु जातो. परिसरातील नागरिकांना घटना घडत असतांनाच तीची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.

  • ग्राम सुरक्षा दल व ग्रामसुरक्षा यंत्रणा एकच आहेत का ? नाही. ग्राम सुरक्षा दल व ग्रामसुरक्षा यंत्रणा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत.
  • ग्राम सुरक्षा यंत्रणेचे नेमके फायदे काय ?
  • घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळते. गावातील कार्यक्रम / घटना बिना विलंब ग्रामस्थांना एकाच वेळी कळतात.
  • अफवांना आळा घालणे शक्य होते.
  • प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येतो. पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यवस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळते.

ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये

  • संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा.
  • गावासाठी यंत्रणा सुरू करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पध्दत.
  • संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600. * यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करूशकतो.
  • संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात परिसरातील नागरिकांना मिळतो. * दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबध्द मदत करता येते.
  • नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात.
  • नियमाबाह्य दिलेले संदेश / अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
  • एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य. * वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या १० किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ

ग्राम सुरक्षा यंत्रणेचा कोणत्या घटनांसाठी वापरू शकतो ?
चोरी, दरोड्याची घटना, गंभीर अपघात निधन वार्ता, आग जळिताची घटना, विषारी सर्पदंश, विषारी साप घरात घुमणे, पिसाळलेला कुत्रा गावात येणे. बिबट्याचा हल्ला, लहान मुल हरविणे, महिलांची छेडछाड, वाहन चोरी, शेतमालाची चोरी, राशन, रॉकेल, यांचे गायात सुरू झालेले वितरण, ग्रामसभा, ग्रामपंचायतच्या योजना सार्वजनिक कार्यक्रम यांची माहिती, गावातील शाळांकडुन दिल्या जाणाऱ्या सुचना, सरकारी कार्यालयांकडुन दिल्या जाणाच्या सुचना, पोलीस यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सुचना इत्यादी

ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी असणारी व्यक्ती गावाबाहेर संकटात सापडली तर वापर करू शकते का ? हो. ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी असणारी व्यक्ती गावाबाहेर संकटात सापडली तर कॉल करू शकते. अशा व्यक्तीचा कॉल ज्या ठिकाणी घटना घडली आहे. त्या परिसरात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असेल तर त्यां परिसरातील नागरिकांना तसेच आपदग्रस्त व्यक्तीच्या गावात कॉल जातात.

ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी असणारी व्यक्ती गावाबाहेर संकटात सापडली तर मदतीला कोण येईल ? ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी असणारी व्यक्ती गावाबाहेर संकटात सापडली तर कॉल करू शकते. अशा व्यक्तीचा कॉल ज्या ठिकाणी घटना घडली आहे. त्या परिसरात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असेल तर त्या परिसरातील नागरिकांनाही जातात. ज्यांना शक्य असेल ते घटनास्थळी मदत करतात तसेच आपदग्रस्त व्यक्तीच्या गावात कॉल गेल्याने गावातील नागरिकही आपापल्यापरीने मदत करण्याचा प्रयत्न करतात.

ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे मदतीचा कॉल मोबाईल वर आल्यावर नेमके काय करावे ? घटनेचे कॉल सर्व गावकऱ्यांना मिळत असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखुन नागरिकांनी मदत करणे अपेक्षित आहे. घटनाग्रस्त व्यक्तीच्या फोनवर फोन करू नये. घटनास्थळी बघ्यांची गर्दी होऊ देऊ नये. गर्दीमुळे दुसरी दुर्घटना घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.

उदाहरणार्थ चोरी दरोडा घरातील सर्वांनी सावध करून तरूणांनी घटनास्थळी काठी किंवा उपलब्ध हत्यारे

घेवुन मदतीसाठी धाव घ्यावी. पोलीस पाटलाने पोलिसांना फोन करून माहिती द्यावी. शक्य तितक्या कमी वेळेत जास्तीत जास्त तरूणांनी घटनास्थळी पोहचावे. पोलीस पाटील व अनुभवी नागरिकांच्या सूचनेप्रमाणे पुढील निर्णय

विषारी सर्पदंश सर्प मित्र असेल तर त्यास तातडीने पाचारण करावे. गावात डॉक्टर असेल तर त्यांना किंवा प्रथमोपचार करण्याची माहिती असणान्या व्यक्तीला तातडीने घटनास्थळी घेवून जावे. डॉक्टरांच्या सुचनेप्रमाणे पुढील कार्यवाही करावी,

लहान मुल हरविणे – संदेशातील वर्णनाचे मुल आपल्या आजूबाजूला / शेतात तर नाही ना याची खात्री करावी. पोलिसांना कळवावे. मुल आढळल्यास आई वडीलांकडे सुपूर्द करावे.

ग्राम सुरक्षा यंत्रणा गावात सुरू कशी करावी ?
प्रत्येक गावात पोलीसस्टेशन कडून ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात येत आहे. स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांची ए सभा घेवुन ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक देण्यात येते. पंचायत समिती कार्यालयात स्थानिक पोलिस ठ पोलीस निरिक्षक व गट विकास अधिकारी यांचे उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक यांना ग्राम यंत्रणेचे प्रात्यक्षिक देण्यात येते.
या ऑनलाइन सभेचे आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी केले.

Previous Post

सरकारने त्वरीत गाव जत्रा व तमाशा चालू करावे – रघुवीर खेडकर

Next Post

ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

Related Posts

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती
इतर घडामोडी

आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती

September 19, 2026
वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!
इतर घडामोडी

वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!

September 19, 2026
शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…
इतर घडामोडी

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

September 19, 2026
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू
इतर घडामोडी

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान
इतर घडामोडी

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

September 19, 2026
Next Post
ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

ताज्या बातम्या

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026