सोलापूर : कुमठे येथील एसपीएम पॉलिटेक्निकमधील तृतीय वर्ष कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थिनी पूजा कोरे, अश्विनी भंडारी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील श्रद्धा सुगुर यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे केपीआयटी टेक्नोलॉजीज लिमिटेड, पुणे येथील मल्टिनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीत निवड झाली आहे.
आत्तापर्यंत या कंपनीत आयटी ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत होती. आता पॉलिटेक्निकचे विद्याथर्हही निवडले जात आहेत. यंदाच्या वर्षी मोजक्याच विद्यार्थ्यांची या कंपनीत निवड झालेली आहे. त्यामध्ये एसपीएम पॉलिटेक्निकमधील सा तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे. सध्या लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे या कंपनीची मुलाखत ऑनलाइन मायक्रोसॉफ्ट टीम ऍपद्वारे झाली होती. त्यामध्ये या विद्यार्थिनींनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थिनींचा आणि त्यांच्या पालकांचा कॉलेजमध्ये मुख विश्वस्त जयकुमार माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निवडीबद्दल या विद्यार्थिनींचे तसेच त्यांचे मार्गर्दशक शिक्षक प्रा. बसवराज स्वामी, प्रा. प्रसाद गायकवाड व प्रा. अनंत चौधरी यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ. दिलीप माने, प्रमुख विश्वस्त जयकुमार माने, विश्वस्त स्वाती माने व प्राचार्या रोहिणी चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. या सत्कार कार्यक्रमाला मुख्य विश्वस्त जयकुमार माने, विश्वस्त स्वाती माने, प्रा. रोहिणी चव्हाण, मॅकेनिकल विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर शिंदे, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा. प्रकाश मेळगे, कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रा. अमृता रूईकर, जनरल सायन्स विभाग प्रमुख प्रा. गिरीजा दिक्षित, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफीसर प्रा. बसवराज स्वामी, प्रा. अनंत चौधरी, प्रा. सोमनाथ थळंगे, प्रा. प्रसाद गायकवाड यांच्यासह विद्यार्थिंनींचे पालक रूपा सुगुरू, प्रकाश कोरे, संतोष भंडारे आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील मुलींचे यश कौतुकास्पद : माने
कंपनीत निवड झालेल्या तिन्ही मुली ग्रामीण भागातील आणि साध्या कुटुंबातील आहेत. त्यांचे मिळवलेले यश उल्लेखनिय आहे. त्यांची चिकाटी एसपीएमधील शिक्षकांचे परिश्रम यामुळे हे साध्य झाले आहे, असे मुख्य विश्वस्त जयकुमार माने यांनी सांगितले.