येस न्युज मराठी नेटवर्क ; अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेत सोलापुरातील मॉडर्न हायस्कूल मधील इयत्ता दहावी मध्ये शिकणारी कृतिका कृष्णात किणीकर या मुलीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस तिला जाहीर झाले असून सहा सप्टेंबर रोजी मंत्रालयात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आजवर कृतिका ने पाठांतर वक्तृत्व स्पर्धा तसेच शास्त्रीय संगीत स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळविली आहेत तिच्या या यशाबद्दल आई वडील कुटुंबासह शाळेतील सर्व शिक्षक वृंदावन कडून कौतुक होत आहे
