शालीजंगा, ओडिशा : या गावातील किशोर बद्रा हा व्यक्ती शेतीचे काम आटपवून घराकडे येत होता. गावातील रस्त्यावर बद्राने चुकून एका सापावर पाऊल पडले. काही सेकंदातच सापाने त्याला दंश केला. मात्र बुद्राने बदला घेण्यासाठी साप हातात घेतला आणि वारंवार त्याचा चावा घेतला. अखेर साप जागीच ठार झाला. काही लोकांनी बद्राला जवळच्या हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला. परंतु एका पारंपारिक उपचारकर्त्याकडे तो उपचारासाठी गेला.