मुंबई : मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये चक्क बाटल्यांचा खच सापडलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मंत्रालय हादरून गेले आहे. मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आल्याच कशा ? असा सवाल आता उपस्थित होतो. मंत्रालय म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यांसमोर चोख पोलीस बंदोबस्त येतो. सर्वसामान्यांची तपासणी केल्याशिवाय मंत्रालयात कोणालाही परवानगी नाही. सर्व नेत्यांसाठीदेखील इथं चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली असते. पण असे असताना देखील मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये चक्क बाटल्यांचा खच सापडलेला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण मंत्रालय हादरून गेले आहे. मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आल्याच कशा ? असा सवाल आता उपस्थित होतो. दरम्यान, याच मुद्द्यावर भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली आहे. हे मंत्रालय नसून मदिरालय असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. करोनाच्या काळामध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते . राज्यात व्यवहार, अनेक कार्यालयं, ऑफिस, मंदिर, धार्मिक स्थळ सर्व बंद केली असताना मात्र मोठ्या प्रमाणात दारूच्या पार्ट्या मंत्रालयात सुरू असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे.या सगळ्यावर आता पुढे काय माहिती समोर येते? महाविकास आघाडी सरकार यावर उत्तर देणार का? मंत्रालयात दारूच्या बाटल्या पोहोचल्या कशा? याचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.