सोलापूर प्रतिनिधी : सुवर्णधन मराठी ज्ञानोपासक प्रतिष्ठान आणि माऊली महाविद्यालय वडाळा.मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट २०२० या क्रांती दिनाच्या औचित्याने राज्यस्तरीय राष्ट्रीय विषयावरील काव्य स्पर्धा आयोजित केली होती. फक्त राष्ट्रीय कविता या स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. ही स्पर्धा राज्यस्तरीय असल्याने महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यातून बहुसंख्येने राष्ट्रीय कविता आल्या ही आनंदाची बाब आहे.कारण राष्ट्रीय विषयावर काव्य स्पर्धेचे पहिलंच वर्ष आहे तसेच सर्व स्तरातील , विविध प्रदेशातून , विशेषत: युवकांमध्ये राष्ट्रीय अस्मिता जोपासने हा मुख्य उद्देश होता तो सफल झाला आहे.
या राष्ट्रीय कविता स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून ‘ कुंकू लढतंय सीमेवर ‘ या श्रीमती चैत्राली जोगळेकरांच्या कवितेला प्रथम; प्रा.निलेश प-हाटे यांना ‘ मातृभूमि ‘ या कवितेसाठी द्वितीय, तर प्रा. राहुल पालके यांच्या ‘भारत देशा ‘ या कवितेला तृतीय क्रमांक मिळाला आहे . या काव्य स्पर्धेतील कवितेचे परीक्षण प्रा. महादेव चव्हाण ,प.प्रवीण पाटील ,डॉ. शिवाजी पाटील प्रा.सौ.यमुना जाधव यांनी केले . या स्पर्धेचा पारितोषिक वितरण प्रदान सोहळा कोरोना पार्श्वभूमी विचारात घेऊन येत्या नऊ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे.
स्पर्धक विजेत्यांना सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र .. पोस्टामार्फत पाठविले जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.धनंजय चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. याप्रसंगी माऊली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.एन.चिट्टे, संस्थापक बळीराम( काका) साठे, अध्यक्ष जितेंद्र साठे तसेच मराठी विभाग प्रमुख व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा डॉ. सौ.सुवर्णा चव्हाण – गुंड डॉ.संजय गुंड,मा.आनंद चव्हाण,मा.रामलिंग चव्हाण, ,प्राचार्य विजय गुंड , प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.