• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, July 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची शरद पवारांनी घेतली भेट

by Yes News Marathi
August 8, 2021
in इतर घडामोडी
0
गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची शरद पवारांनी घेतली भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सांगोला दौऱ्यावर आहेत, दिवंगत माजी आमदार गणपराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली व त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गणपतरावांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांना श्रद्धांजली अपर्ण केली.यावेळी शरद पवार म्हणाले, ”लोकांसाठी झटणारा माणूस हरपला. लोकांच्या प्रश्नांबद्दल अतिशय चिंता आणि त्यातला त्या महाराष्ट्रातील दुष्काळी भाग पिण्याच्या व शेतीचा पाण्याचा प्रश्न जिथे भेडसावतोय, त्यासाठी अखंड चिंता आणि चिंतन या दोन्ही गोष्टी गणपतपरावांचे वैशिष्ट होते .

१९६२ मध्ये ते सर्वप्रथम महाराष्ट्राच्या विधानसभेत आले, मी १९६७ मध्ये आलो माझ्या अगोदर पाच वर्षे ते आले. १९६७ नंतर जवळपास एक किंवा दोनदा काहीतरी खंड पडला, ते सलगपणे महाराष्ट्राच्या विधानसभेत होते. ग्रामीण भागातील जीवन सुखकर व्हावे यासाठी ते कायम आग्रही होते. त्यांच्या इतका स्वच्छ, चारित्र्यसंपन्न असा नेता असणे हे महाराष्ट्राचे भाग्य होते .” शरद पवार म्हणाले, मला एका गोष्ट आठवते की माझ्या मंत्रिमंडळात ते कृषि विभागाचे मंत्री होते, पण त्या अगोदर जेव्हा मंत्रिमंडळ करायचं होतं त्यावेली डी बी पाटील व गणपतराव देशमुख यांची नावं, शेकाप पक्षाच्या वतीने घेतली गेली आणखी एकजण कुणीतरी होते . पण त्यावेळी सतत गणपतरावांचा आग्रह होता की मला नका करू, रायगड जिल्हा हा शेकापचा एक महत्वाचा जिल्हा आहे आणि तिथं दत्ता पाटील म्हणजेच डी बी पाटील हे अतिशय प्रभाव असलेली व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांनाच ही जागा दिली जावी मला देता कामा नये, त्यासाठी तुम्ही त्यांचाच विचार करा, हा आग्रह शेवटपर्यंत गणपतरावांनी केला. परंतु, आम्ही त्यावेळी १८ मुद्द्यांचा एक कार्यक्रम, सरकार कसे चालवायचे याचा केला होता आणि त्या मुद्य्यांमध्ये जी चर्चा करणारी लोक बसली होती, त्यामध्ये गणपतरावांचा समावेश होता. गणपतरावांनी एकच गोष्ट सांगितली की, काही झाले तरी ग्रामीण भागातील माणसांना दोन वेळच्या अन्नासाठी झगडायला लागता कामा नये. कष्ट करायचा त्याचा कायदेशीर अधिकार आहे, हे सूत्र आपल्याला आणायच आहे. त्यासाठी रोजगार हमीचे धोरण या सरकारच्या १८ कलमी कार्यक्रमात सगळ्यात महत्वाचे धोरण आणि हा भाग असला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. म्हणून मंत्रिंडळाची निर्मिती करण्याच विचार आला तेव्हा आम्ही सर्वांनी सांगितले की रोजगार हमी याबद्दल या सरकारचा आग्रह असेल, तर त्याची अंमलबजावणी करायला, गणपतरावांशिवाय आमच्या समोर दुसरा माणूस नाही. म्हणून गणपतरावांनी नाही म्हणायचं सोडून द्यावे . अखेर शेवटी ते तयार झाले.”

Previous Post

राहुल गांधींविरोधात ट्विटरची मोठी कारवाई

Next Post

राज्यस्तरीय राष्ट्रीय विषयावरील काव्य स्पर्धेत जोगळेकर, प-हाटे, पालके यांचे यश

Next Post
राज्यस्तरीय राष्ट्रीय विषयावरील काव्य स्पर्धेत जोगळेकर, प-हाटे, पालके यांचे यश

राज्यस्तरीय राष्ट्रीय विषयावरील काव्य स्पर्धेत जोगळेकर, प-हाटे, पालके यांचे यश

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group