येस न्युज नेटवर्क : भारतात कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. देशात आता दरदिवशी जवळपास 40 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. रविवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 39,070 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 491 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरात 24 तासांत 43,910 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
ऑगस्टमध्ये तिसऱ्यांदा 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 2 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट रोजी 40 हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 1 ऑगस्ट रोजी 40,134, 2 ऑगस्ट 30,549, 3 ऑगस्त रोजी 42625, 4 ऑगस्ट रोजी 42982, 5 ऑगस्त रोजी 44643, 6 ऑगस्त रोजी 38628 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.