नवी दिल्ली: मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरनं भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबत ट्विट केलं आहे. महेंद्रसिंह धोनीनं शेवटचं ट्विट जानेवारी महिन्यात केलं आहे. महेंद्रसिंह धोनीच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवल्याबद्दल ट्विटरकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. धोनीच्या अकाऊंटला पुन्हा ब्ल्यू टिक दिली जाणार का हे पाहावं लागणार आहे.
ब्ल्यू टिक असलेलं ट्विटर अकाऊंट हे वेरिफायड आणि ऑथेनटिक समजलं जातं. ट्विटरकडून नामवंत व्यक्तींच्या अकाऊंटला ब्ल्यू बॅज दिला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटरनं भारतातील मोठ्या नेत्यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली होती.