येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालूनचं सण वार यांची रचना करण्यात आलेली आहे, तेव्हा आपल्या संस्कृतीत या सणावारांच खूप महत्व आहे,असं प्रतिपादन शिवचरित्रकार , आयुर्वेद तज्ञ मा.डॉ. शिवरत्न शेटे यांनी केलं.
गणेशयुग परिवाराच्या वतीने निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचं प्रदर्शन आणि श्री गणेश कॅलेंडर प्रकाशन या निमंत्रित लोकांच्या सोहळ्यात डॉ. शिवरत्न शेटे बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संस्कृती प्रमाणे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती ला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आलं.कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये गणेशयुग चे विकास गोसावी यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली , ते म्हणाले सध्या POP गणपती मुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, त्यामुळे आता आपण सगळे पर्यावरण पूरक शडो च्या मूर्ती गणेश मूर्ती ची स्थापना करणे गरजेचे आहे.
गेल्या 10 दहा वर्षांपासून गणेशयुग परिवाराच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती त्यांनी तयार केले आहेत, आणि कित्येक कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहेत. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कॅलेंडर प्रकाशन करण्यात आलं, त्यानंतर कॅलेंडर मध्ये 21 कलाकारांनी फोटोशूट केलेलं असून त्यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला, आणि त्यानंतर डॉ. शिवरत्न शेटे यांच्या हस्ते पर्यावरण पूरक गणेश मूर्ती चं प्रदर्शनाचं उदघाटन करण्यात आलं. हे प्रदर्शन 5 ऑगस्ट पासून 10 सप्टेंबर पर्यंत निर्मलकुमार फडकूले सभागृहाच्या तळमजल्यात असणार आहे, सर्व गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन गणेशयुग चे विकास गोसावी यांनी केलं आहे.
या कार्यक्रमाच सूत्रसंचालन विनायक दुदगी आणि अनुराधा पत्तार यांनी केलं तर आभार प्रदर्शन आसावरी गांधी यांनी केलं .