मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील राजकीय सुप्त संघर्ष परत एकदा चर्चेचा विषय झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवस मराठवाड्यातील परभणी , हिंगोली , नांदेड या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान यावेळी तिन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र अनुपस्थित राहणार आहेत.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अल्पसंख्यांक समाजाच्या विभागातील वसतिगृहाचे उद्घाटन तसेच जिल्हाधिकार्यांना समवेत आढावा बैठक घेणार आहेत.
राज्यपाल यांचा राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीत लेख कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांच्या वाढत्या राजकीय हस्तक्षेपाचाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यपाल भवन येथे भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप कुंटे यांनी राजभवनला कळवला होता. त्यानंतर राज्यपाल त्यांच्या दौऱ्यात अपेक्षित बदल करतील असं वाटत असतानाच राज्यपाल यांनी पूर्वनियोजित दौर्यात कोणताही बदल केलेला नाही.राज्यपाल तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोळी संबंधित आढावा घेणार असून जिल्हाधिकारी तसेच इतर सर्व प्रशासकीय अधिकारी त्यावेळेस उपस्थित राहणार आहेत. तसेच वसतिगृहाचे उद्घाटन देखील करणार आहेत. राज्यपालांचा महाविकासआघाडी मधील प्रशासनात आणि राजकीय हस्तक्षेप अधिक असल्याचा आरोप यापूर्वी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. मात्र वारंवार राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री असा सुप्त संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे.