नवी दिल्ली : प्रशांत किशोर यांनी ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे.राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आगामी काळात काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची चर्चा सुरू असून, काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत मिळत आहे. राजकीय वर्तुळात काँग्रेसमधील बदलांची चर्चा सुरू असतानाच प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची साथ सोडली आहे. प्रशांत किशोर यांनी ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल लागल्यापासून रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नावाची केंद्रीय राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या केंद्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान दिलं जाणार असल्याचीही चर्चा आहे. या चर्चेला दुजोरा देणारीच वृत्त आता समोर आलं आहे. प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिल्यानं अमरिंदर सिंग यांना मोठा धक्का असल्याचे मानले जाते आहे. सार्वजनिक आयुष्यातून थोडा वेळ विश्रांती हवी असल्याचे कारण देत प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिला आहे. “सार्वजनिक आयुष्यापासून काही काळ दूर राहण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मुख्य सल्लागार पदाची कामं करण्यासाठी मी सक्षम नाही. मला माझ्या भविष्यातील वाटचालींबद्दलही निर्णय घ्यायचा असून, मी आपल्याला विनंती करतो की, मला या जबाबदारीतून मुक्त करावे”, असे प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे.