सोलापूर : मंदिरी या उपक्रमानुसार आदर्श बालक मंदिर या शाळेतील सहशिक्षक जनार्दन प्रभाकर वाघमारे यांनी दीड वर्षापासून शाळेच्या प्रवाहात नसलेल्या शाळेतील मुलांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी कोरोना पूर्वीची आपली शाळा हे उद्दिष्ट समोर ठेवून विद्यार्थ्यांना मंदिरात व झाडाखाली कोरोनाचे नियम पाळून शालेय परिपाठ, कवायत, गप्पागोष्टी, गाणी या माध्यमातून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य वाघमारे सरांनी केलेला आहे.
आपल्या शाळेतील 2 विद्यार्थीनीना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उतरवून यश संपादन केलेले आहे. महाराष्ट्र शासनाने 45 दिवसाचा सेतु अभ्यासक्रम जो राबविलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये विविध जिल्ह्यातील 1500 हून अधिक शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणात सहकार्य केलेले आहे. कोरोनाच्या काळात लहान मुलांच्या आरोग्य बाबतीत विविध विषयावर लेखन केलेले आहे. त्याना कोरोनाच्या काळात विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाबरोबरच आपले ऑफ लाइन शिक्षण देता यावे. त्यासाठी पालकांच्या गृहभेटी, पालकांशी चर्चा, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी त्यानुसार अध्यापन केले .शिक्षक आपल्या दारी त्यानुसार मुलाच्या घरी किंवा मंदिरात अध्यापनाचे पवित्र कार्य त्यांनी केले आहे . या सदर उपक्रमास कादर शेख, प्रशासनअधिकारी म.न.पा.शिक्षण मंडळ, संतोष बुलबुले, सविता पवार, संस्थेचे सचिव अरुण गायकवाड, सुनीता गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका निकहत शेख व इतर सहकारी शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.