सोलापूर : 15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणाऱ्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापुरातील सायकल लवर्स, सोलापूर यांचेकडून “फ्रीडम राईड” चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सराईत सायकलपटू यांच्यासाठी 75 कि.मी तर नवख्या सायकलपटू साठी 25 कि.मी अंतराची राईड असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सायकल राईड व्हर्चुअल स्वरूपाची होणार असून सायकल स्वरांनी योग्य ती खबरदारी घेऊन सायकलिंग करायचे आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक सायकलस्वारास सायकल लव्हर्स, सोलापूर यांचेकडून आकर्षक ट्रॉफी व टी-शर्ट देण्यात येणार आहे. रजिस्ट्रेशन लिंक 5 ऑगस्ट पर्यंतच खुली राहणार असून ज्या सायकल प्रेमींना यामध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यांनी 95451 04442 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन सायकल लव्हर्सचे समन्वय महेश बिराजदार, अमेय केत, अविनाश देवडकर, आदित्य बालगावकर व डॉ.प्रवीण ननवरे यांच्याकडून करण्यात आले आहे.