सोलापूर : सोलापुरातील कॉस्मेटोलॉजीस्ट डॉ. रोहित गणेचारी यांच्या नवी पेठेतील ” कॉस्मेडिक क्लिनिक ” चे उद्घाटन शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निमा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक टेंभुर्णीकर, जंगम समाजाचे अध्यक्ष शिवयोगी शास्त्री, निमा संघटनेचे पदाधिकारी व सोलापुरातील डॉक्टर उपस्थित होते.
सध्या पोषणाचा अभाव, प्रदूषण, व युवा वर्गामध्ये पसरलेल्या गैरसमजुती यामुळे त्वचा ,केस , व इतर सौंदर्यविषयक समस्या वाढल्या आहेत. डॉक्टर रोहित यांनी कॉस्मेटोलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. नवी पेठ येथील व्यास कॉम्प्लेक्समध्ये “कॉस्मेडिक क्लिनिक” च्या माध्यमातून ते सोलापूर व आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांसाठी आपली सेवा देणार आहेत चेहऱ्यावरील मुरूम, काळे डाग, खड्डे, केस गळती, केस पिकणे, टक्कल पडणे, त्वचारोग इत्यादी समस्यांवर परिसरातील रुग्णांना उपचार मिळतील त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर यांनी केले.