राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
सोलापूर : सोलापूर – हैदराबाद व सोलापूर – अक्कलकोट रस्त्यावर अवैध हातभट्टी दारू निर्मितीसाठी लागणाऱ्या बळीची विनापरवाना बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन आयशर टेम्पो वर कारवाई करुन राज्य उत्पादन शुल्क विभागाने १९ मेट्रिक टन मळी आणि दोन वाहने जप्त केली आहेत .
या मळीची आणि वाहनांची किंमत १९ लाख ९५ हजार ५०० रुपये आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क शाखा सोलापूरचे निरीक्षक रवींद्र आवळे व उपाधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.