सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणामध्ये सध्या 62 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे उजनी अजूनही तीन पॉईंट 34% मायनस मध्ये आहे. विशेष म्हणजे गेल्या चोवीस तासात पुणे जिल्ह्यात आणि उजनी धरण परी क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला आहे भीमा खोऱ्यातील या पावसामुळे उजनी लवकरच प्लस मध्ये येईल अशी आशा निर्माण झाली आहे. येत्या दोन दिवसात उजनी धरण प्लस मध्ये येईल. 31ऑगस्ट रोजी उजनी धरण 100 टक्के क्षमतेने भरलं होतं तर गेल्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी उजनी धरण 123 TMC म्हणजेच 111 टक्के एवढे भरले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी उजनी कधी भरेल याची सोलापूर जिल्हावासीयांना आशा निर्माण झाली आहे