सोलापूर : मागील पन्नास दिवसांत सोलापूर जिल्ह्यात सरासरी पावसाच्या १५५ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सात टक्के अधिक पाऊस झाला असून, जुलै महिन्यात ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २५३.८० मिलिमीटर पाऊस झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वाधिक तर माळशिरस तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. जूनमध्ये १०२ सरासरी पाऊस असून, प्रत्यक्षात १३६ मिमी पाऊस झाला आहे