येस न्युज मराठी नेटवर्क : महिला सक्षमतेकडून महिला सशक्तीकरण या विचाराने प्रेरित होऊन महिलांना स्वयं रोजगार निर्माण व्हावे याकरिता सोलापूरच्या कार्यसम्राट आमदार प्राणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे नूतन उपाध्यक्ष सुशिल बंदपट्टे यांनी महिला रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून सोलापूर जिल्हा उदयोग केंद्राचे प्रकल्प अधिकारी कांबळे आणि त्यांचे सहकारी राम सुतार हे उपस्थित होते. या मेळाव्यास प्रभाग क्र. ४ बुधवार पेठ परीसरातील तब्बल २०० पेक्षा जास्त महिलांचा सहभाग होता. महिलांनी लहान लहान उद्योगधंद्यांची निवड करून स्वतः उद्योजक बनण्याचे आवाहन कांबळे यांनी केले. प्रकाश वाले यांनी मार्गदर्शन करताना शासनाकडून असंख्य कल्याणकारी योजना महिलांसाठी राखीव असून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचेही त्यांनी महिलां सुचविले. मेळाव्यात बोलताना सुशील बंदपट्टे यांनी स्वयंरोजगाराचे महत्व पटवून सांगितले, महिलांनी स्वावलंबी होऊन स्वतःच्या परिवार उभारणीसाठी मोलाचा वाटा उचलला पाहिजे असे आवाहन केले. महिलांनी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत उद्योजक होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चंद्रनील सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.
