सोलापूर : महापालिकेचा covid-19 चा मंगळवार दिनांक सहा जुलै चा अहवाल प्राप्त झाला आहे. सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात नव्याने १९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे . या कालावधीत रुग्णालयातून १३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही सध्या रुग्णालयांमध्ये ८६ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.