येस न्युज मराठी नेटवर्क : राष्ट्रीय हरित लवाद ,नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सुनावणी बैठक बोलावली होती त्यात त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या इंजिनीयर चलवादी यांना चिमणी पाड कामाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यास सांगितले ,तसेच अवर सचिव गोखले यांनी फेब्रुवारी महिन्यात पाठवलेल्या न्याय व विधी विभागाचे अहवाल येईपर्यंत चिमणी पाडकाम करू नये या पत्रास तात्काळ उत्तर देण्यास सांगितले त्यामुळे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को-जनरेशन ची अनधिकृत बांधलेली चिमणी पडण्याची प्रक्रिया आता जोमाने सुरू झाली आहे.
तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कोजनरेशन प्लांटसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही परवानगी न घेता बांधकाम केल्यामुळे व गेल्या सात वर्षात चिमणी मुळे आणि कारखान्यामुळे प्रदूषण झाल्यामुळे कारखान्या विरोधात क्रिमिनल कोर्ट केस दाखल केली आहे असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे आणि सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले त्यावर कारखान्यामुळे झालेले वायु आणि मळी मुळे झालेले पाणी आणि जमिनीच्या प्रदूषणाचे सर्वेक्षण करून ०९ ऑगस्ट २०२१ पर्यंत राष्ट्रीय हरित लवादाकडे त्याचा अहवाल पाठवण्यास सांगण्यात आले. सोलापूर विमान प्राधिकरण यांनासुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी चिमणी पाड कामात लक्ष घालून सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरून त्वरित नागरी विमानसेवा चालू करण्याबद्दल आदेश दिले. आजच डीजीसीए मुख्यालय यांच्याकडून सुद्धा सोलापूर एअरपोर्ट अथोरिटी यांना होटगी रोड विमानतळाच्या मोतीचे चिमणी आणि इतर सर्व अडथळे त्वरित दूर करण्याबद्दल मेल आलेला आहे. त्यामुळे सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनाधिकृत चिमणी आता संपूर्ण कारखान्याच्या जीवावर उठलेली आहे आणि लवकरच त्याचे पाडकाम होऊन सोलापूरच्या सुसज्ज होडगी रोड विमानतळावरून नागरी विमान वाहतूक सुरू होण्या बद्दल अत्यंत सकारात्मक बैठक पार पडली. या बैठकीत याचिकाकर्ते कारखान्याचे माजी तज्ञ संचालक संजय थोबडे व कोर्टात अवमान याचिका दाखल करणारे डॉ. संदीप आडके हे सुद्धा उपस्थित होते.