सोलापूर : हैद्राबाद येथील आज़मपुरा येथील माजी नगरसेवक व मज़लीस बचाव तेहरीक पार्टीचे संस्थापक अमजतुल्लाह खान यांचा सत्कार सोलापूर येथील विश्व कल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान मैंदर्गी यांच्या तर्फे करण्यात आला. MBT पार्टीचे संस्थापक जनाब अमजतुल्लाह खान हे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणूकीत थोडक्यात मताने पराभूत झाले. पराभूत होऊन देखील खचून न जाता लगेच दुसरीया दिवशी पासून अमजतुल्लाह खान हे “प्रजा दरबार” भरवून हे लोकांच्या अडचणी सोडवत आहे.
पिक् अप रिक्षा किंवा ऑटो रिक्षा या गरीब चालकांनी लॉकडऊन मध्ये हफ्ते न भरल्यामुळे फायन्स वाल्यांकडून जप्त केले जात आहे त्या गरीब चालकांची अमजतुल्लाह खान हे पिक् अप रिक्षा व ऑटो रिक्षा सोडवण्यासाठी या गरीब चालाकांसाठी सोशल मिडीया माध्यमातून अमजतुल्लाह खान हे मदतीचे आव्हान करत त्या गरीब चालकांना त्यांची पिक् अप रिक्षा व ऑटो रिक्षा हफ्ते भरून परत मिळवून देत आहे,व जर विदेशात नोकरी संदर्भात गेलेल्या भारतातील नागरीकांची फसवणूक झाली असेल तर अमजतुल्लाह खान हे जातीने लक्ष्य देत विदेशात फसवणूक झालेल्या भारतीय नागरीकांची सुद्धा ते मदत करत त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे.
अमजतुल्लाह खान यांच्या निस्वार्थी कार्यामुळे प्रभावित होऊन सोलापूरातील विश्व कल्याण फाऊंडेशन अध्यक्ष इरफान मैंदर्गी यांनी हैद्राबाद येथे जाऊन त्यांच्या कामाचे कौतुक करत अमजतुल्लाह खान यांचे सत्कार करण्यात आलं. अमजतुल्लाह खान यांनी आभार मानत व आपले मनोगत व्यक्त करत म्हणाले कि सोलापूरातील समाजसेवकांनी देखील “प्रजा दरबार” राबवून मजबूर, लाचार, गरीब लोकांच्या अडचणी जाणून त्या सोडवण्यात यावे जेणे करून त्या मजबूर, लाचार,गरीब लोकांना वाटू नये कि त्यांची व्यथा ऐकणारा कोणीच नाही व अडचणी सोडवणारा कोणीच नाही असे त्या गरीब लोकांना वाटू नये..