सोलापूर : राष्ट्रीय ओबीसी ब्रिगेड ( महाराष्ट्र राज्य ) या सामाजिक संघटनेच्या वतीने आज रोजी ३०जून हा ओबीसी दिवस म्हणून साजरा केला गेला. या कार्यक्रमाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष किशोर शेटे साहेब व मल्लीनाथ चौधरी ( जिल्हा अध्यक्ष व प्रचार प्रमुख ) यांनी संयोजन केले होते. सदरचा कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून संतोष जी राऊत ( अध्यक्ष,सोलापूर शहर नाभिक दुकानदार संघटना ) यांनी भुषविले, कार्यकमाचे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वैभव शेटे ( महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,महाराष्ट्र नाभिक महामंडळ ) यांना कार्यक्रमास बोलावले होते ! प्रास्ताविक ओबीसी दिनाचे महत्व किशोर शेटे यांनी सांगितले.
त्यानंतर वैभव शेटे ओबीसी राजकीय आरक्षण रद्द कां व कसे झाले व ओबीसी वर अन्याय सरकार कडून कसा झाला व होत आहे व भविष्यात देखील टांगती तलवार राहील असे शंका देखील बोलून दाखविली व नंतर संतोष राऊत यांनी संघटनेचे सामाजिक कार्य व योगदान, ओबीसीची भुमिका याबद्दल दिवसेन दिवस कसे वृध्दींगत होत आहे याबद्दल आपले विचार मांडताना समाधान व्यक्त केले ! कार्यकमाचे समारोप प्रसंगी आपले विचार भीमराव गंगाधरे सरांनी मार्गदर्शन केले व त्यांच्या फार्म हाऊस वर कार्यक्रम करण्यात संमती दिली त्याबद्दल सरांचे आभार मानण्यात आले.
सदरच्या वृक्षारोपन कार्यक्रमास महिला पदाधिकारी मोनिका पवार, संतोष राऊत, वैभव जी शेटे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपन करण्यात आले !या कार्यक्रमा प्रसंगी सर्वश्री शशिकला कस्पटे, नसीमा सेतसनदी, राजश्री कोडमुर, श्रीकांत राऊत, मनोज डिगे, पांडुरंग पवार, आनंद वाघमारे, संजय चिखले, सुमीत गवळी, रणदिवे, पंडित इ. व अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या मोठया आनंदात व उत्साहात पार पाडला !तसेच ब्रम्हकमळाचे पुजन सौ.शशिकला कस्पटे यांच्या हस्ते झाले व संतोष राऊत यांनी नारळ फोडून ब्रम्हकमळाचे पूजन केले व दर्शन घेतले !